सांजेचे हे रूप.. हळद आणि गुलालाने सजलेले..
हे रूप दुपार कधीच घेऊ शकत नाही.
तिला फार तर ढगांची ओढणी.
पण हा श्रुंगार सांजच करू जाणे.
कधी कधी चंद्राची ओढ असं काही करायला भाग पाडत असेल सांजेला..
सांजेचा हा श्रुंगार पाहुन चंद्र तार्यांचा लवाजमा मागे सोडून अवेळी उगवतही असेल.
आणि ती दुपार, तिला हे सारं अनोळखी.
तिला स्वतःची तळपदार, मिश्कील ऐट.
तिचा खेळ आणि तिचा काळ दोन्ही वेगळे.
दाहक, निर्भीड, आपल्यातच परिपूर्ण.